Nigadi : कामाचे पैसे न दिल्याने तरुणाने पेट्रोल ओतून घेऊन केली आत्महत्या

एमपीसी न्यूज – कामाचे मिळालेले पैसे ओळखीच्या माणसाकडे ठेवण्यासाठी दिले. कालांतराने दिलेले पैसे मागण्यासाठी तरुण गेला असता त्याने पैसे परत दिलेच नाहीत. यामुळे तरुणाने पेट्रोल अंगावर ओतून आत्महत्या केली. ही घटना दुर्गानगर झोपडपट्टी आकुर्डी येथे शुक्रवारी (दि. 17) घडली.

संदीप बैसाने (वय 28) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सतीश उंदा बैसाने (वय 36, रा. बामणे, ता. सिंदखेडा, जि. धुळे) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मंगल बापू आव्हाड (वय 38, रा. दुर्गानगर झोपडपट्टी, आकुर्डी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप कामासाठी पिंपरी-चिंचवड शहरात आला होता. त्याने ठिकठिकाणी काम करून जमा केलेले पैसे आव्हाड याच्याकडे ठेवण्यासाठी दिले. कालांतराने गरजेच्या वेळी संदीपने आव्हाडकडे पैशांची मागणी केली. मात्र, संदीपला पैसे मिळाले नाहीत.

या नैराश्यातून संदीपने आव्हाड याच्या घरासमोर अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.