Nigdi : किरकोळ कारणावरुन टोळक्याची मारहाण

एमपीसी न्यूज – हॉटेलमधून बाहेर पडताना धक्का लागल्याचा जाब विचारल्यावरून पाच जणांच्या टोळक्याने दोघांना मारहाण केली. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथे घडली.

श्राहित वसंत गावडे (वय 26, रा. टेल्को गेट समोर, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सागर सावंत आणि त्याचे चार साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गावडे आणि त्यांचा मित्र असे दोघेजण ट्रान्सपोर्ट नगर मधील हॉटेल अविष्कार मध्ये जेवण पार्सल आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी हॉटेलच्या गेट समोर आरोपीने गावडे यांना धक्का दिला. त्यामुळे गावडे यांनी आरोपीला जाब विचारला. यावरून आरोपीने त्यांच्या अन्य साथीदारांना बोलावून गावडे आणि त्यांच्या मित्राला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. स्टीलची केटली, स्टीलची आर्ठस बकेट, पाण्याचा जग, टिश्यू पेपरचे स्टॅंड यांसारख्या वस्तूंनी मारहाण केली. यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.