Nigdi : तरुणाला जीवे मारण्याची धमकी देत ‘गुगल पे’ ॲपवरून 15 हजार ट्रान्सफर; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – तरुणाला जीवे मारण्याची धमकी देत त्याच्या ‘गुगल पे’ ॲप वरून दोन मोबाईल क्रमांकावर एकूण 15 हजार 500 रुपये ट्रान्सफर करून घेतले. हा प्रकार शनिवारी सायंकाळी चिंचवड स्टेशन येथे घडला. याप्रकरणी तीन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

सैफअली निसार शेख (वय 26, रा. मोरवाडी पिंपरी) यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी शेख चिंचवड स्टेशन येथील कॉसमॉस बँकेच्या पाठीमागील मोकळ्या जागेत थांबले होते. त्यावेळी अनोळखी तीन इसम त्यांच्याजवळ आले. त्यांनी शेख यांना जीवे मारण्याची धमकी देत दमदाटी केली.

तसेच शेख यांच्या ‘गुगल पे’ ॲप वरून 9607258225 या क्रमांकावर तीन टप्प्यांमध्ये 13 हजार रुपये तर, 9767766207 या क्रमांकावर अडीच हजार रुपये असे एकूण 15 हजार 500 रुपये ट्रान्सफर करून घेतले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.