Nigdi : दरवाजाची कडी तोडून 51 हजारांची घरफोडी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – निगडीमध्ये अज्ञात चोरट्यांनी दरवाजाची कडी तोडून घरातून 51 हजार 100 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 13) रात्री यमुनानगर येथे उघडकीस आली.

हर्षल मुकुंद खैरे (वय 22, रा. यमुनानगर, निगडी) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. 15) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खैरे यांचे घर 11 मार्च रोजी दुपारी तीन ते 13 मार्च रोजी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या दरम्यान कुलूप लावून बंद होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 51 हजार 100 रुपयांचा ऐवज चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.