Nigdi : निगडीत 7 दिवसीय आमदार चषक स्पर्धा उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज –  आमदार उमा खापरे आणि बॉर्न क्रेझी स्पोर्टस् क्लब यांच्या वतीने 1 ते 7 मे  दरम्यान आमदार चषकचे आयोजन केले होते. डे-नाईट क्रिकेट स्पर्धा झाली असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पर्धेला भेट देऊन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. (Nigdi) तसेच समारोपाला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे मॉडेल अर्शिया राशिद, रवरंभा चित्रपटाची अभेनेत्री मोनालिसा बागल, चित्रपटाचे डायरेक्टर अनुप जगदाळे यांनी देखील उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार उमा खापरे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप जी मोरे, शैलजा मोरे,ॲड. वर्षा डहाळे, अरुण थोरात, केशव घोळवे, राजेंद्र बाबर , समीर जावळकर, हंबीरराव आवटे, मिलिंद इनामदार, जयदीप खापरे, जागृती खापरे , सुशांत मोहिते, सतीश कुटे, सत्यन देशमुख, संतोष मुळीक, कुंदन चौधरी,कशिफ संगम ,मंगेश जोंधळे, प्रदीप साळवे तसेच बोंड क्रेझी स्पोर्ट्स क्लब चे सर्व सदस्य व खेळाडू उपस्थित होते.

7 मे रोजी स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक 2 लाख 50 हजार रुपये व ट्रॉफी स्वराज्य 11 या गटाने पटकावले. (Nigdi) द्वितीय 1 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम व ट्रॉफी प्रशांत भाऊ म्हाळस्कर ह्या टीमने पटकावले. तृतीय आणि चतुर्थ 1 लाख रुपये रक्कम व ट्रॉफी चे मानकरी यशवंत भाऊ पाचांगे व श्रीतेज 11 चाऱ्होली हे ठरले.

Manobodh by Priya Shende Part 98 : मनोबोध भाग 98 – हरीनाम नेमस्त पाषाण तारी

मॅन ऑफ द सिरीज मिळवण्याचा मान राहुल सातव या खेळाडूने मिळवला, त्यांना यामाहा FZ बाईक भेट देण्यात आली. उत्कृष्ट गोलंदाज सलमान शेख यांना कुलर तर उत्कृष्ट फलंदाज (Nigdi) दत्ता पवार यांना देखील कुलर देण्यात आले. याचप्रमाणे 40  टीममध्ये रहीम 11 ह्या टीमने पहिला बक्षीस पटकावत 33 हजार रोख रक्कम व ट्रॉफी चे हकदार झाले.

शरद 11 ह्या टीमने द्वितीय बक्षीस पटकावत 22 हजार  रोख रक्कम व ट्रॉफी चे हकदार झाले. पुणे युनिव्हर्सिटी ह्या टीमने तृतीय बक्षीस पटकावले. तरंग मोबाईल ह्या टीमने चातुर्थ बक्षीस पटकावले.

यात वैयक्तिक पारितोषिक देखील देण्यात आले. मॅन ऑफ सिरीज नंदू लोंढे, उत्कृष्ट गोलंदाज दत्ता पवळे उत्कृष्ट फलंदाज गिरीष यांना बहुमान मिळाला. (Nigdi) महिलांनी देखील उत्तम सामना रंगवला गेम चेंजर ह्या टीमने पहिला बक्षीस पटकावत ट्रॉफी मिळवली. ईगल्स ह्या टीम देखील ट्रॉफी ची हकदार झाली. महिलांमध्ये वुमन ऑफ सिरीज मिळवण्याचा मान प्रांजल म्हस्के यांनी मिळवला. उत्कृष्ट फलंदाज दुर्गा शिंदे उत्कृष्ट गोलंदाज माधुरी बनसोडे यांनी मिळवला.

खेळ म्हंटला की पडझड होते पण यावेळी आयोजक टीम ची तत्परता देखील महत्वाची असते. 2 खेळाडूंना सामन्यादरम्यान इजा झाली पण वेळेत डॉक्टर्स आणि ॲम्बुलन्स उपलब्ध असल्याने अपघात टाळता आला. खेळाडूंचा दवाखान्यातील खर्च बोन क्रेझी स्पोर्ट्स क्लब ने केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.