Nigdi : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित शिबिरात 70 जणांनी केले रक्तदान

70 people donated blood in the camp organized on the occasion of Shiv Rajyabhishek Day

एमपीसी न्यूज – शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा निगडीच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यमुनानगर येथील श्री सातेरी देवी मंदिरात झालेल्या या शिबिरात 70 जणांनी रक्तदान केले.

याप्रसंगी भोसरी मतदारसंघाचे आमदार व भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे आपल्या समाजासाठी व देशासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रक्त संकलनाचे प्रमाण वाढविणे गरजचे आहे.

नगरसेवक उत्तम केंदळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोनाच्या काळामध्ये तीन महिन्यांच्या कालावधीत केंदळे यांच्या माध्यमातून करण्यात आलेली कामे ही मदत न समजता त्यांची समाजाप्रती असणारी कर्त्यव्य आहे.

_MPC_DIR_MPU_II

सामाजिक बांधिलकी म्हणून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो त्यामुळे प्रत्येक संकटकाळी मदत व सहकार्य करताना त्यांची तळमळ दिसून येत आहे.

नगरसेवक उत्तम केंदळे म्हणाले की, आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत. ते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे समाजात काम करताना काही अडचणी येत नाहीत.

या शिबिरासाठी नगरसेविका कमल घोलप, जितू पवार, दिनेश यादव, युवा मोर्चाचे अध्यक्ष संकेत चोंधे, दीपक नागरगोजे, बापू घोलप, दिलीप पवार, ज्येष्ठ नागरिक गजानन ढमाले, सुभाष सराफ, गोरख कोलते, अमृत अबनावे, रमेश घोडेकर तसेच भाजपचे बाबा परब, शेखर आसरकर, लक्ष्मीताई विर्डीकर, मेघा पोटफोडे, तसेच भाजपचे बाबा परब, शेखर आसरकर, लक्ष्मीताई विर्डीकर, मेघा पोटफोडे आदि मान्यवर उपस्थित होते.

या शिबिराचे नियोजन युवा मोर्चा मुक्ता गोसावी, अंजली पांडे, शर्मीली मेहेर, गौरी केंदळे यांनी केले होते अशी माहिती केंदळे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.