Nigdi: कोयत्याचा धाक दाखवून दारुच्या दुकानातील 80 हजार रुपये लांबविले

एमपीसी न्यूज – भांडणे झाल्याचे नाटक करत दोघांनी देशी दारुच्या दुकान मालकाला कोयत्याचा धाक दाखवून गल्ल्यातील 80 हजार रुपयांची लांबविली. ही घटना शुक्रवारी (दि.5)रात्री नऊच्या सुमारास थरमॅक्स चौक, चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी साजन हरिदास धंन्दर (वय 28, रा. निगडी गावठाण)यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

साजन याचे थरमॅक्स चौकात देशी दारु विक्रीचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री त्यांच्या दुकानात अनोळखी दोघे जण आले. दोघांनी संघनमताने भांडणे झाल्याचे नाटक केले. एकाने साजन याला कोयत्याचा धाक दाखविला. दोघांनी दुकानातील गल्ल्यातील 80 हजार रुपयांची रोकड आणि दोन हजार रुपयांचा मोबाईल असा 82 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. निगडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.