Nigdi : कारच्या धडकेत दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – इमारतीच्या खाली खेळत असलेल्या दीड वर्षीय चिमुकल्याला भरधाव वेगात आलेल्या कारने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 20) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास गगनगिरी मठाजवळ, चिंचवड स्टेशन येथे घडली.

अथर्व महादेव गोपरेड्डी (वय दीड वर्षे) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी अश्विनी महादेव गोपरेड्डी (वय 25, रा. गगनगिरी मठाजवळ, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एम एच 14 / जी एन 8433 या कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास अथर्व गगनगिरी मठाजवळ निर्मला बिल्डिंग बी विंग समोर त्याच्या मित्रांसोबत खेळत होता. त्यावेळी ब्राऊन रंगाची टाटा हेक्सा कार (एम एच 14 / जी एन 8433) भरधाव वेगात आली. कारने अथर्वला धडक दिली. या धडकेत अथर्व गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, कार चालक अपघात झाल्यानंतर तिथून पळून गेला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.