Nigdi : अल्पवयीन मुलीची छेड काढून तिच्या आई आणि भावाला मारहाण

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या मुलाला तिच्या भावाने जाब विचारला असता मुलाने भावाला मारहाण केली. तसेच भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या मुलीच्या आईलादेखील मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 28) दुपारी अडीचच्या सुमारास यमुनानगर, निगडी येथे घडली.

याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या 41 वर्षीय आईने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीची छेड काढत असे. तसेच ती रस्त्याने जात असताना तिच्याशी गैरवर्तन करत असे. याबाबत फिर्यादी याच्या मुलाने आरोपी मुलाला जाब विचारला. यावरून आरोपी मुलाने त्याला मारहाण केली. ही भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादी यांना देखील आरोपी मुलाने मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.