Nigdi : ‘अ’ परिमंडळ कार्यालयातील लिपीक कोरोना पॅाझिटिव्ह; नायब तहसिलदारांसह 18 कर्मचारी ‘होम क्वारंटाईन’

'A' Circle Office Clerk Corona Positive; 18 employees including Deputy Tehsildar 'Home Quarantine' :संबंधित कार्यालय पुढील आठ दिवसांसाठी बंद

एमपीसी न्यूज – निगडी येथील संत तुकाराम व्यापारी संकुल इमारतीमध्ये असलेल्या ‘अ’ परिमंडळ रेशनिंग कार्यालयातील लिपिकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या परिमंडळ कार्यालयाचे नायब तहसीलदारांसह अठरा कर्मचाऱ्यांना ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे.

या लिपिकाची काल (बुधवारी) कोरोना चाचणी करण्यात आली होती व त्याचा अहवाल आज, गुरुवारी पॉझिटिव्ह आला. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित कार्यालय पुढील आठ दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे.

तसेच, या लिपिकाच्या संपर्कात आलेले नायब तहसीलदार दिनेश तावरे यांच्यासह इतर अठरा कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

कामासाठी विश्रांतवाडी ते निगडी असा दुचाकी वरून प्रवास करणाऱ्या या लिपिकाला किरकोळ ताप आणि घश्यात खवखव जाणवत होती. परिमंडळ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन त्याला चाचणी करण्यास सांगितली. दरम्यान, त्याचा कोरोना चाचणी अहवाल हा सकारात्मक आला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत एमपीसी न्यूज’ बोलताना नायब तहसीलदार दिनेश तावरे म्हणाले, कार्यालयातील आम्ही सर्वजण होम क्वारंटाईन झालो आहोत. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आठ दिवस रेशनींग कार्यालय उच्च अधिकाऱ्याच्या परवानगीने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

तावरे पुढे म्हणाले, निगडी येथील रेशनींग कार्यालयात दररोज 200 ते 250 लोक गर्दी करत असतात. या कार्यालयाशी मागील एक आठवड्यात ज्या लोकांचा संपर्क आला आहे त्यांनी स्वतःला काही दिवस आयसोलेट करावे. गरज भासल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन नायब तहसीलदार दिनेश तावरे यांनी नागरिकांना केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.