Nigdi : सूनेचा विश्वासघात करून आर्थिक फसवणूक प्रकरणी सासूविरुद्ध गुन्हा

एमपीसी न्यूज – सासू आणि सुनेच्या नावाने असलेल्या संयुक्‍त खात्यावरील सुमारे 31 लाख रुपये सासूने सुनेच्या परस्पर काढून घेतल्याप्रकरणी सुनेने सासूविरोधात विश्वासघात केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना प्राधिकरण निगडी येथे घडली.

मंगल साहेबराव जगताप (वय 65) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी सासूचे नाव आहे. आरती दिगंबर जगताप (वय 43, दोघीही रा. पेठ क्रमांक 24, प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासू मंगल आणि सून आरती या दोघींचे प्राधिकरण, निगडी येथील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये संयुक्‍त खाते आहे. 29 डिसेंबर 2006 ते 31 डिसेंबर 2009 या कालावधीत सासू मंगल यांनी या संयुक्‍त खात्यावरील 31 लाख आठ हजार परस्पर काढून घेतले. तसेच काढलेली रक्‍कम खर्च केली. याचा आरती यांना मानसिक त्रास झाला. याबाबत आरती यांनी त्यांची सासू मंगल यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.