BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : जागेत अतिक्रमण करून बांधकाम केल्याप्रकारणी एकावर गुन्हा

0

एमपीसी न्यूज – जागेत अतिक्रमण करून पूर्वीचे बांधकाम पाडून नवीन बांधकाम केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 22 ऑगस्ट 2019 रोजी दत्तनगर, निगडी येथे घडली.

दशरथ घुले (रा. निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रामभाऊ गुडप्पा जगदाळे (वय 46, रा. दत्तनगर, निगडी) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामभाऊ यांच्या जागेत आरोपी दशरथ याने बेकायदेशीररीत्या प्रवेश केला. रामभाऊ यांचे जुने बाथरूमचे बांधकाम पाडून बेकादेशीरपणे ओटा बांधून पाच फूट उंचीही भिंत बांधली, असे रामभाऊ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.