Nigdi : विज्ञान दिनानिमित्त मॉडर्न हायस्कूलमध्ये डिजिटल क्लासरूमचे उदघाटन

एमपीसी न्यूज – यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून डिजिटल क्लासरूमचे उदघाटन उदघाटन संस्थेचे उपकार्यवाह शरद इनामदार, प्राचार्य सतीश गवळी यांच्या हस्ते करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अवघड संकल्पना सोपी करण्यासाठी डिजिटल क्लासरुम तयार करण्यात आली आहेत.

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दिवंगत राष्ट्रपती व शास्त्रज्ञ अब्दुल कलाम आणि सी.व्ही .रामन यांच्या प्रतिमेस पुष्यहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरूवात झाली. शालेय विद्यार्थीनी अंजुम शेख हिने व्याख्यानाद्वारे विज्ञान दिनाची महती व माहिती उपस्थितांना सांगितली.

याप्रसंगी बोलताना शरद इनामदार म्हणाले, विद्यार्थ्यांना या डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग अभ्यास करताना होणार असून परिणामकारक अध्यापन होणार आहे. यावेळी विज्ञान शिक्षक राजीव कुटे, रामभाऊ घाडगे, मीना अधिकारी, सुरेखा कामथे, उमा बिरजे, सुनंदा खेडेकर, अनुराधा आंबेकर, अर्चना उंडे, वर्षा पाचारणे आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.