Nigdi : दुचाकीस्वारच्या बॅगमधून मोबाईल चोरला

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून जात असलेल्या व्यक्तीच्या बॅगमधून मोबाईल चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 4) रात्री साडेआठच्या सुमारास खंडोबा माळ चौक ते थरमॅक्स चौक या दरम्यान घडली.

अनिल दत्तात्रय शिंदे (वय 37, रा. साने चौक, चिखली) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास अनिल खंडोबा माळ चौक ते थरमॅक्स चौक या मार्गावरून दुचाकीवरून जात होते. रस्त्याने जात असताना त्यांच्या मागच्या बॅगमध्ये त्यांनी त्यांचा 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन ठेवला होता. अज्ञात चोरट्यांनी त्यांचा मोबाईल फोन चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.