Nigdi : निगडी येथे कारमध्ये ठेवलेले पिस्तूल चोरीला

एमपीसी न्यूज – कारमध्ये ठेवलेले पिस्तूल अज्ञात (Nigdi) चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 7) सकाळी प्राधिकरण निगडी येथे उघडकीस आली.

पवन मनोहरलाल लोढा (वय 36, रा. प्राधिकरण निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad : लिफ्टच्या बहाण्याने तरुणाला लुटले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लोढा यांच्याकडे परवानाधारक पिस्तूल आहे. त्यांनी ते एका बॅगमध्ये ठेऊन बॅग कारमध्ये ठेवली. सोमवारी रात्री त्यांनी कार घरासमोर पार्क केली.

रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने कारच्या दरवाजाची काच खाली करून बॅगमधून दीड लाखाची पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे चोरून नेली. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.