Nigdi : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अटकेत

पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. : Abuse of a minor girl; Accused arrested

एमपीसी न्यूज – किराणा दुकानातून दूध आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने ओढून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार बुधवारी (दि. 12) सकाळी साडेआठ वाजता अजिंठानगर, चिंचवड येथे घडला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मोहन चिनप्पा कु-हाडे (वय 38, रा. अजिंठानगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी किराणा दुकानातून दूध आणण्यासाठी बुधवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घराबाहेर आली.

अण्णा भाऊ साठे चौकाजवळ थांबलेल्या आरोपीने अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने एका पत्र्याच्या शेडमध्ये ओढून नेले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ‘आवाज केलास तर तुझ्या आईला खल्लास करून टाकीन’ अशी आरोपीने मुलीला धमकी दिली.

मुलीने घरी आल्यानंतर घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर गुरुवारी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.