Nigdi Accident : निगडी येथे कारच्या धडकेत मृत झालेल्या पादचाऱ्याची पटली ओळख

एमपीसी न्यूज : निगडी येथे मंगळवारी कारच्या (Nigdi Accident) धडकेत मृत झालेल्या पादचाऱ्याची ओळख पटली असून पोलीसांकडून त्या कार चालक आरोपीचा शोध चालू आहे. मृत व्यक्तीचे नाव कैलास परदेशी (वय 54 वर्षे, रा. निगडी) असे आहे. या घटनेबाबत निलेश परदेशी (वय 31 वर्षे, रा. निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अज्ञात कार चालकाविरोधात भा. द. वि. कलम 279, 304(2), 201, मोटर व्हेइकल कायदा कलम 134(अ) (ब) सह 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल दुपारी मोरया बॅग हाऊससमोर मधल्या रोडवर मधुकर पवळे उड्डाणपूलाजवळ जुना पुणे – मुंबई हायवेवर निगडी येथे ही घटना घडली होती. कार एम एच 14 जी वाय 7992 च्या चालकाने वाहन हयगयीने, बेदरकारपणे, धोकादायक रीतीने चालवून फिर्यादींचे वडील कैलास परदेशी यांना रस्ता क्रॉस करीत असताना धडक दिली होती. जखमी परदेशी यांना आरोपीने त्याच्या कारमध्ये व हायवेवरील बॉम्बे सिलेक्शन दुकानाच्या लगत गंगानगरकडे जाणाऱ्या फुटपाथवर सोडून जाऊन पुरावा नाहीसा करण्याचा प्रयत्न केला.

Chakan Police Action : मोटार सायकल चोरांची टोळी जेरबंद; चाकण पोलिसांची कारवाई

फिर्यादीच्या वडिलांना वेळेत वैद्यकीय (Nigdi Accident) मदत न मिळाल्याने त्यांचा मृत्यू होईल हे माहिती असतानाही ते जाणीवपूर्वक त्यांना सोडून गेले. आरोपीने या घटनेबाबत पोलिसांना कळवायचे असूनही ते कळवले नाही. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, की जखमी पादचाऱ्याला पिंपरी येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. त्याला तेथे डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत घोषित केले होते. त्याचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.