Nigdi : विनयभंगाच्या गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाची कामगिरी : Accused arrested for absconding for over a year

एमपीसी न्यूज – विनयभंगाच्या गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे.

कुणाल चन्द्रसेन गायकवाड (वय 21, रा. अजंठानगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक निशांत काळे यांना माहिती मिळाली की, निगडी पोलीस ठाण्यात मागील वर्षी दाखल असलेल्या एका विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी कुणाल गायकवाड हा देहूगाव कमानीजवळ येलवाडी येथे येणार आहे.

त्यानुसार पोलीस कर्मचारी काळे, पुलगम, कौशल्ये, शेडगे, डोळस यांनी सापळा रचून कुणाल याला शिताफीने ताब्यात घेतले.

कुणाल यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या मिळताच त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले.

तो गुन्हा केल्यापासून पोलिसांना चकमा देऊन पळून जात होता. त्याला अटक करून पुढील कारवाईसाठी निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.