Nigdi: ओटास्किम परिसरात वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविणाऱ्या दरोडयाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक

Nigdi: Accused arrested for vandalizing vehicles and terrorizing या गुन्ह्यातील आरोपी संग्राम भोसले आणि विकी लष्करे यांनी इतर साथीदारांच्या सोबतीने फिर्यादी स्तुती यांच्या पतीबरोबर शिवीगाळ करत भांडण केले.

एमपीसी न्यूज- मिलिंद नगर ओटास्किम निगडी परिसरात लोखंडी कोयते, रॉड, हातोडी अशी घातक हत्यारे घेवून वाहनाची तोडफोड करुन दहशत माजवणाऱ्या दरोडयाच्या गुन्हयातील आरोपींना गुन्हे शाखा युनिट 2 ने ओटास्किम परिसरातून अटक केली आहे.

आरोपी विकी उर्फ विकास शिवाजी लष्करे (वय 23, धंदा- बिगारी काम रा. राजनगर, समाजमंदीर जवळ, ओटास्किम निगडी) तसेच त्याच्या इतर दोन साथीदार अशा तिघांना पोलिसांनी ओटास्किम परिसरातून अटक केली आहे.

याप्रकरणी स्तुती शंकर शिंदे (वय. 19, रा. मिलिंद नगर ओटास्किम निगडी) यांनी मंगळवारी (दि.7) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी याप्रकरणी संग्राम भोसले, सुनील चव्हाण, अजय देवकर, अविनाश लष्करे, करण लष्करे आणि विक्की लष्करे (सर्व रा. मिलिंद नगर, ओटास्किम, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यातील आरोपी संग्राम भोसले आणि विकी लष्करे यांनी इतर साथीदारांच्या सोबतीने फिर्यादी स्तुती यांच्या पतीबरोबर शिवीगाळ करत भांडण केले.

दवाखान्यात झालेल्या खर्चाचे कारण देत स्तुती यांच्या गळ्यातील चार ग्रॅम वजनाची 16,000 रुपये किंमतीची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून घेतली. तसेच परिसरात दहशत पसरवण्यासाठी चारचाकी वाहनांची तोडफोड करुन नुकसान केले.

फिर्यादी स्तुती यांच्या फिर्यादीची दखल घेऊन गुन्हे शाखा युनिट 2 कडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास सुरु करण्यात आला.

त्यामध्ये पोलीस नाईक जमीर तांबोळी यांनी त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन पोलीस उपनिरीक्षक एस डी निलपत्रेवार यांनी सहाय्यक फौजदार संपत निकम, पोलीस हवालदार दिपक खरात, पोलीस नाईक चेतन मुंढे व जमीर तांबोळी यांचे खास पथक ओटास्किम परिसरात नेमून आरोपींची शोध मोहीम राबविण्यात आली.

दरम्यान, तपासात या गुन्हयातील तीन आरोपींना ओटास्किम परिसरातून अटक करण्यात पोलिसांना यश आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.