Nigdi : वंचित घटकांना मदतीचा हात देणारी उच्चशिक्षित आंशिका झाँब

एमपीसी न्यूज – उच्च शिक्षण पूर्ण करून मोठ्या हुद्द्यावर नोकरी करावी किंवा आपला स्वतःच व्यवसाय थाटावा हे तरुणवर्गाचे स्वप्न असते. पण हे स्वप्न पूर्ण करीत असताना ज्या समाजामधून आपण पुढे आलेलो आहे. त्या समाजाचे आपण काही देणे लागतो याची जाणीव मोजक्याच तरुणांना असते. त्या तरुणवर्गाचे प्रतिनिधित्व करणारी उच्चशिक्षित तरुणी आहे आंशिका झाँब. घरामधूनच सामाजिक कार्याचे बाळकडू मिळालेल्या आंशिकाला एक सामाजिक संस्था उभी करायची आहे. ज्यामधून समाजातील गरजू लोकांना, शिक्षणापासून वंचित झालेल्या मुलांना मदतीचा हात देता येईल

मूळची चंदिगडची असणारी आंशिका झाँब ही मुंबईमध्ये लहानाची मोठी झाली. तिने आय.आय.टी वाराणसीसारख्या देशातल्या प्रसिद्ध तंत्रशिक्षण महाविद्यालयांतून अभियांत्रिकीच शिक्षण पूर्ण केले आहे. तिचे वडील राष्ट्रीय अणुऊर्जा महामंडळमध्ये वैज्ञानिक अधिकारी म्हणून काम नोकरी करतात. वडिलांच्या नोकरीनिमित्त ते मुंबईत स्थायिक झाले. अंशिकाचे वडील राष्ट्रीय अणुऊर्जा महामंडळमध्ये वैज्ञानिक अधिकारी म्हणून काम पाहतात.

लहानपणी गरीब मुलांना कपडे आणि खाऊवाटप करून ती आपला वाढदिवस साजरा करीत असे. तिथूनच तिच्या समाजकार्याला सुरुवात झाली. आंशिका सध्या पुण्यात नोकरीनिमित्त स्थायिक झाली असून. तिने आपल्या परीने समाजकार्य सुरु ठेवले आहे. रस्त्यावरील लहान मुलांना भटकत पैसे मागताना पहाते तेंव्हा तिला वाईट वाटते. त्यांना मदत करावी, अशी भावना निर्माण होत असल्याचं ती सांगते. लहान मुलांना भीक मागायला लावणे चुकीचे असून त्यांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करणे गरजेचे आहे, असे तिला वाटते. एवढेच बोलून ती थांबली नाही तर काही गरजू मुलांची शैक्षणिक फी भरून त्यांना परत शाळेत जाण्यास प्रवृत्त केले आहे. अलीकडेच तिने निगडी येथील एका फुगे विकणाऱ्या कुटुंबाला भाजीचा गाडा विकत घेऊन दिला आहे. या भाजीच्या गाड्यावर कुटुंबातील आठ लोकांचा उदरनिर्वाह सुरु आहे.

अंशिकाने अनेक गरजूंना महिन्याचे रेशन भरून दिले आहे. रस्त्यावर भटकणाऱ्या लहान मुलांना व भिकाऱ्यांना ती महागड्या हॉटेलमध्ये नेऊन त्यांना हवे ते खाऊ घालते. विविध अनाथ आश्रमात जाऊन तेथील अनाथांना मायेचा व मदतीचा हात देते. स्वतःसाठी कसली हौस न करणारी अंशिका निराधारांना कायम मदत करत असते.

“मला फार साधं आणि सोप्पं आयुष्य जगायचं आहे आणि दुसऱ्याचं पण आयुष्य तेवढाच सोप्पं करायचं आहे. कोण्या गरिबाला आर्थिक मदत करण्यापेश्या त्याला पोटभर जेवण आणि अंगभर कपडे दिले पाहिजेत.मला माझ्या सामाजिक कार्याचा आवाका वाढवायचा आहे आणि मदतीसाठी लोकांना एकत्रित करून एका एनजीओ ची स्थापना करायची आहे. ज्याद्वारे लहान मुलांच्या शिक्षणासाठी आणि हक्कासाठी काम करता येईल. लोकांनी पुढे येऊन समाजातील या मुलांसाठी आपल्या परीने काम करावे व परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवे. मला या समस्यांवर काम करायचं आहे आणि ते निरंतर करत राहणार. घरातील लोक यासाठी किती मदत करतील माहित नाही पण मी स्वतःला एवढी सक्षम बनवणार आहे की या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मला नेहमी प्रेरणा मिळत राहील” असे ती आत्मविश्वासाने सांगते.

जवळ असणाऱ्या पैशाचा स्वतःसाठी कमी आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी जास्त उपयोग करायचा निर्धार अंशिकाने केला आहे. प्रशासकीय सेवेची तिला विशेष आवड आहे आणि या माध्यमातून आपण बऱ्याच समस्या सोडवू शकतो असा विश्वास तिला वाटतो. आंशिका झाँबहिच्या सारख्या तरुणींना पाठबळ देण्यासाठी समाजातील तरुणवर्गाने पुढे येण्याची खरी गरज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.