Nigdi : ग्रंथालयांना ग्रंथ भेटसाठी अर्ज करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या रवींद्रनाथ ठाकूर ग्रंथालयाच्या वर्धापनदिनानिमित्त पुण्याजवळील ग्रामीण भागातील दोन लहान ग्रंथालयांना ग्रंथरुपाने भरीव मदत गेल्या चार वर्षापासून सातत्याने करण्यात येत आहे.

यंदा ग्रंथालय वर्धापनदिनास अशी ग्रंथभेट दिली जाणार असून त्यासाठी ग्रामीण भागातील ग्रंथालयाकडून अर्ज मागविण्यात आले असून दि. १५ फेब्रुवारीपर्यंत हे अर्ज सावरकर मंडळ, सावरकर सदन, सेक्टर नं. २५ निगडी येथे जमा करण्याचे आहेत, असे ग्रंथालय सहकार्यवाह प्रदीप पाटील यांनी सांगितले असून अधिक माहितीसाठी 9822604751 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.