Nigdi : भाजप नगरसेविकेच्या अंगावर कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज- अंगावर कार घालून भाजप नगरसेविकेला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. 12) निगडी येथील भक्ती- शक्ती चौकात घडला. त्याचप्रमाणे या नगरसेविकेचा विनयभंग करण्यात आल्याचेही उघडकीस आले आहे. या प्रकरणी फॉर्च्युनर कार चालक आणि अशोक काळे (वय 57, रा. चिंचवड ) यांच्या विरोधात 47 वर्षीय नगरसेविकेने निगडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणी या प्रकरणी फॉर्च्युनर कार (एमेच 14 जीएस 909) वरील चालक आणि अशोक काळे (वय 57, रा. चिंचवड ) या दोघांच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर नगरसेविका आपल्या पतीसोबत प्राधिकरणात आपल्या मुलीला भेटण्यासाठी गेल्या होत्या. तेथून दुपारी दीडच्या सुमारास परत आपल्या चिंचवड येथील राहत्या घरी जात असताना आरोपींनी आपली फॉर्च्युनर कार नगरसेविकेच्या मोटारीला आडवी घालून थांबवली. त्यानंतर कार चालकाने “माझ्या मालकाच्या विरोधात तक्रार का दाखल केली ? ” असे विचारीत नगरसेविकेला धक्काबुक्की केली .

कारमध्ये बसलेल्या काळे याने अश्लील हावभाव नगरसेविकेचा विनयभंग केला आणि तिच्या अंगावर कार घालण्यास चालकाला सांगितले. चालकाने आपल्या ताब्यातील कार नगरसेविकेच्या अंगावर घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. घाडगे पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.