Nigdi : एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून दोघांवर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये जेवण करताना एकमेकांकडे बघितले असल्याच्या कारणावरून दोन तरुणांवर कोयत्याने वार केले. ही घटना रविवारी (दि. 21) दुपारी साडेपाचच्या सुमारास चिंचवड मधील शेतकरी मळा हॉटेलसमोर घडली.

ज्ञानेश्वर मारुती कदम (वय 24, रा. तळवडे) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बंटी काळभोर (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्याच्या मित्रा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर आणि त्यांचे मित्र चिंचवड मधील एका हॉटेलमध्ये रविवारी दुपारी जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण करत असताना आरोपी बंटी त्या हॉटेलमध्ये होता. ज्ञानेश्वर आणि त्यांच्या मित्राने आरोपी बंटीकडे बघितले. याचा राग मनात धरून त्याने त्याच्या केले साथीदाराला बोलावले. ज्ञानेश्वर यांचे जेवण झाल्यानंतर ते हॉटेलच्या बाहेर आले. त्यावेळी बंटीच्या साथीदाराने ज्ञानेश्वर यांच्या मित्राच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने मारले. यामध्ये मित्र गंभीर जखमी झाला. ज्ञानेश्वरमध्ये आले असता त्यांना देखील आरोपीने कोयत्याने मारले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like