Nigdi : फोटो स्टुडिओमध्ये पावणेतीन लाखांचा डल्ला मारून अन्य चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – तीन चोरट्यांनी मिळून फोटो स्टुडिओचे लॉक तोडून स्टुडिओमधून 2 लाख 77 हजार 450 रुपयांचे कॅमेरे आणि इतर साहित्य चोरून नेले. तर एटीएम मशीन, बँक आणि दोन दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (दि. 5) पहाटे दोनच्या सुमारास निगडी प्राधिकरण येथे घडली.

हेमंत शामसुंदर मिश्रा (वय 48, रा. निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात तीन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हेमंत यांचे निगडी प्राधिकरण येथे ‘शाम आर्ट फोटो स्टुडिओ’ नावाचे दुकान आहे. मंगळवारी रात्री हेमंत यांनी दुकान कुलूप लावून बंद केले. रात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे लॉक तोडून आतमध्ये प्रवेश केला. दुकानातील 2 लाख 77 हजार 450 रुपयांचे कॅमेरे व इतर साहित्य चोरट्यांनी चोरून नेले.

फोटो स्टुडिओमधील चोरीनंतर चोरटयांनी दुकानाच्या बाजूला असलेले एसबीआय एटीएम सेंटरमधील कॅश डिस्पेंसर मशिन तोडून उचकटण्याचा प्रयत्न केला. सेक्टर नंबर 25 येथील कोटक महिंद्रा बँक, सिटी प्राईड बिल्डिंगमधील गंगर आयनेशन, वैदेही सिलेक्शन या ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला. याबाबत गुन्हा दाखल केला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.