Nigdi : खासदार बारणे यांचा दुर्गा टेकडीवर मॉर्निंग वॉक आणि नागरिकांशी संवाद

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आज (रविवारी) निगडी येथील दुर्गा टेकडीवर मॉर्निंग वॉक केला. यावेळी त्यांनी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. प्रत्येक्ष खासदार मॉर्निंग वॉकसाठी आलेले पाहून नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला. खासदार बारणे यांनी सर्वांशी संवाद साधला.

मॉर्निंग वॉकसाठी खासदार श्रीरंग बारणे, जिल्हाध्यक्ष मावळ गजानन चिंचवडे, शहराध्यक्ष योगेश बाबर, अमित गोरखे, राम पात्रे, रोमी संदु, विजय गुप्ता, अमोल निकम, सय्यद पटेल, पार्थ गुरव, नाना काळभोर, त्रिभुवन गुदल, दिलीप भोंडवे, निखिल येवले, राजेश पाबळे, विकास भिसे, भाविक देशमुख, शरद जगदाळे, सरिता साने, कामिनी मिश्रा, शैला पाचपुते, कल्पना जाधव, ज्ञानेश्वर शिंदे आदी उपस्थित होते.

दररोज सकाळी निगडी, आकुर्डी, प्राधिकरण आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने दुर्गा टेकडीवर येतात. खासदार बारणे यांनी दुर्गा टेकडीवर असलेल्या दुर्गादेवीचे दर्शन घेतले. रस्त्यात त्यांनी व्यायाम आणि मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या मतदारांची भेट घेतली. आज सकाळी-सकाळी खासदार दुर्गा टेकडीवर आलेले पाहून नागरिकांनी त्यांच्याशी उत्स्फूर्तपणे संवाद साधला. प्रत्येकाने बारणे यांच्याशी हस्तांदोलन करत गप्पा मारल्या. तसेच काहींना आपला सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. काही नागरिकांनी खासदार बारणे यांच्यासोबत सेल्फी देखील घेतला. सर्व नागरिकांच्या समस्या यावेळी खासदार बारणे यांनी जाणून घेतल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.