BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : महावीर जयंतीनिमित्त उद्या अहिंसा रॅली

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – श्री 1008 भगवान महावीर अहिंसा ट्रस्टच्यावतीने जन्मकल्याणक महोत्सव आयोजित केला आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम प्राधिकरणात होणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अजित पाटील यांनी दिली.

प्राधिकरण येथील सेक्टर नं. 25 येथील श्री 1008 भगवान महावीर दिगंबर जैन मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहे. सकाळी साडेसात वाजता जैन मंदिरात मंगल कलश घेऊन मिरवणूक निघणार आहे. प. पू. 108 चिंतनमहर्षी डॉ. प्रणामसागरजी महाराज यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा निघणार आहे. सकाळी नऊ ते एकपर्यंत नेत्रदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता अहिंसा रॅली निघणार आहे. ही रॅली जैन स्थानक वाकड रोड, थेरगाव-प्राधिकरण-पिंपरी चौक-रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे समारोप होणार आहे. सायंकाळी सहा वाजता भक्तीगीतांचा कार्यक्रम व अहिंसा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.