Nigdi : भरदिवसा दुचाकीस्वाराला रस्त्यात अडवून लुटले

एमपीसी न्यूज – भरदिवसा दुचाकीस्वाराला रस्त्यात अडवून त्याला मारहाण करत लुटले. ही घटना रविवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास खंडोबा माळ चौक ते थरमॅक्स चौक या रोडवर घडली.

अमोल अश्रुबा नाईक (वय 30, रा मोईगाव, ता. खेड) यांनी या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चार चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल त्यांच्या दुचाकीवर रविवारी दुपारी खंडोबा माळ चौक ते थरमॅक्स चौक या रस्त्यावरून जात होते. ते गरवारे कंपनीच्या गेट समोर आले असता चार जणांनी मिळून त्यांची दुचाकी अडवली. चौघांनी अमोल यांना मारहाण करत त्यांच्याकडील मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण बावीस हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक आरदवाड तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.