Nigdi : रुग्णालयाकडे खंडणी मागणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या ‘फेक पीए’ला अटक

BJP state president Chandrakant Patil's fake PA arrested for demanding ransom from hospital: आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज – एका रुग्णालयातील  डॉक्टरला फोन करून  25 लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या फेक पीएला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोरगरिबांना मदत करण्याच्या नावाखाली संबंधित व्यक्तीने खंडणी मागितली होती. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीकडे पोलीस कसून चौकशी करीत आहेत.

सौरभ संतोष अषटुल (वय 21, रा. गंजपेठ, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी सिमकार्ड, मोबाईल फोन आणि एक दुचाकी असा एकूण 35 हजारांचा ऐवज ताब्यात घेतला आहे.

आरोपीने भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने एका रुग्णालयाला फोन करून गोरगरिबांना मदत करण्यासाठी 25 लाख रुपयांची मागणी केली होती.

तसेच पैसे न दिल्यास बघून घेण्याचीही भाषा केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले होते. मात्र, आपला तो फोन तीन आठवड्यांपूर्वीच चोरीला गेला असल्याचे त्या व्यक्‍तीने सांगितले होते.

पोलिसांनी आणखी तपास करून चंद्रकांत पाटील यांच्या फेक पीएला ताब्यात घेतले आहे.

शहरातील एका नामांकित रुग्णालयास फोन करून मी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचे फोनवरील व्यक्‍तीने सांगितले होते. आम्हाला करोनाच्या पार्श्‍वभूमीवर गोरगरिबांना मदत करायची आहे.

_MPC_DIR_MPU_II

त्यासाठी मी माझा पर्वतीमधील कार्यकर्ता पाठवितो. त्याच्याकडे ते पैसे द्या. तसेच पैसे न दिल्यास बघून घेण्याची भाषाही फोनवरील त्या व्यक्‍तीने केली होती.

फोनची माहिती देणाऱ्या ॲपवर देखील चंद्रकांत पाटील यांचे नाव आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले. संबंधित रुग्णालयातील डॉक्‍टरांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता आपल्या कार्यालयातून असा कोणताही फोन केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच याबाबत गुन्हा दाखल करण्याचा सल्लाही दिला. त्यानुसार शुक्रवारी (दि. 17) याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर निगडी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपी सौरभ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.

पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1