BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणतर्फे 2 ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज- रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणतर्फे थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर 2 ऑक्टोबर रोजी निगडी प्राधिकरण मधील वीर सावरकर भवन येथे सकाळी आठ ते दुपारी दोन या कालावधीत होणार आहे.

थॅलेसेमिया हा अनुवांशिकतेने होणारा जनुकीय आजार आहे. यामध्ये रुग्णाच्या रक्तातील हिमोग्लोबिन खूपच कमी असते आणि तांबडय़ा रक्तपेशींची संख्याही सर्वसाधारण कमी असते. प्राणवायू वाहून नेण्यासाठी तांबड्या पेशींत हिमोग्लोबीन मुबलक प्रमाणात असणे गरजेचे आहे. शरीरात हिमोग्लोबीन नसल्यामुळे शरीराला गरजेइतकाही प्राणवायू मिळत नाही. प्राणवायूची गरज पूर्ण न झाल्याने रुग्णाच्या मृत्यूचाही धोका संभवतो. यामुळे या आजारात दर 15 दिवसांनी रक्त द्यावे लागते.

थॅलेसेमिया रुग्णांच्या मदतीसाठी रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणतर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. रक्तदान केल्याने शरीरात नवीन रक्ताची निर्मिती होते. रक्तदान केल्याने जेवढा फायदा गरजूंना होतो. त्यापेक्षा अधिक फायदा रक्तदात्याला होतो. परिसरातील नागरिकांनी या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3