Nigdi : बोगस रेशन कार्ड देणाऱ्या एजंटवर गुन्हा

एमपीसी न्यूज – एका महिलेकडून पैसे घेऊन बोगस रेशनिंग कार्ड तयार करून देणाऱ्या महिला एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना निगडी येथे घडली.

आशा झुंबड गाडेकर (वय 50, रा. वाकड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दिवे ताई (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) या महिला एजंटच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गाडेकर या जुलै 2019 च्या पहिल्या आठवड्यात शिधापत्रिका काढण्यासाठी निगडी येथील कार्यालयात गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी दिवे ताई हिने त्यांच्याकडून रेशनिंग कार्ड काढून देण्यासाठी एक हजार रुपये घेतले. मात्र बोगस रेशनिंग कार्ड काढून दिले.

गाडेकर यांना आपल्या रेशनिंग कार्डमध्ये एक नाव टाकायचे होते. यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून त्या रेशनिंग ऑफिसमध्ये चक्कर मारत होत्या. गुरुवारी त्या रेशनिंग अधिकाऱ्यांना भेटल्या असता त्यांचे रेशनकार्ड बोगस असल्याचे अधिका-यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे रेशनिंग अधिकाऱ्यांनी गाडेकर यांना सोबत घेऊन निगडी पोलीस ठाणे गाठले. बोगस रेशनिंग कार्ड दिल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1