Nigdi : ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे सावरकर जयंती साजरी

एमपीसी न्यूज- ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा सलग पाचव्या वर्षी सावरकर जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त निगडी ते चिंचवड अशी भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली.

या निमित्त रविवारी निगडी येथील सावरकर उद्यानातील सावरकरांच्या अर्धपुतळ्यास संघटनेचे महेश देशपांडे व गौरव मुळे यांच्यातर्फे पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तसेच सर्व सावरकर प्रेमींनकडून सुजित कुलकर्णी यांनी सावरकरांवरील गीताचे सामूहिक गायन म्हणवून घेतले. दूरदृष्टी असलेल्या सावरकरांचे विचार ठीकठिकाणी पोहोचवेत यासाठी संघटनेतर्फे दरवर्षी साजरी केल्या जाणाऱ्या सावरकर जयंती सोहळ्याची थोडक्यात माहिती संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_II

त्यानंतर भगवे झेंडे व ‘जय हिंद, जय सावरकर’च्या जयघोषात निगडी ते चिंचवड अशी भव्य दुचाकी रॅली देखील काढण्यात आली. या रॅलीचे नियोजन ऋषीकेश राजहंस, अभिषेक करवंदे, पंकज कंदलगावकर, आशिष जोशी व सहकाऱ्यांनी केले. ही दुचाकी रॅली चिंचवड येथे आल्यावर मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे हे देखील रॅलीत सहभागी झाले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. या रॅलीत प्रियंका कुलकर्णी, संजीवनी पांडे, योगिता अक्कलकोटकर, सुषमा वैद्य, वैभवी अवताडे यांच्यासह महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता.या रॅलीचा समारोप चिंचवड येथील मंगलमूर्ती वाड्यात अथर्वशीर्ष पठणाने झाला. हा कार्यक्रम यशस्वी करणारे राजन लोणकर व रॅलीमध्ये सावरकरांचा जयघोष करणारी चिमुकली सावरकर प्रेमी समीक्षा अक्कलकोटकर हिचा सत्कार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अंकित काणे, सचिव योगेश अत्रे व सहसचिव रोहन जोशी यांच्याकडून करण्यात आला.

उद्या मंगळवारी (दि. 28) सावरकर जयंतीनिमित्त सर्व सावरकर प्रेमींसाठी रामकृष्ण मोरे सभागृहात सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या सावरकरलिखित गीतांच्या विनामूल्य कार्यक्रमास सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन शहराध्यक्ष तपन इनामदार यांनी केले.आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1