Nigdi : यमुनानगर येथे खिडकीची ग्रील उचकटून घरफोडी

एमपीसी न्यूज – यमुनानगर निगडी (Nigdi) येथे अज्ञात चोरट्यांनी घरच्या खिडकीची ग्रील उचकटून घरफोडी करून 72 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवार (दि. 26) ते शनिवार (दि. 28) या कालावधीत घडली.
प्रसाद मुरलीधर कुलकर्णी (वय 44, रा. निगडी) यांनी या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chikhali : आर्थिक कारणावरून एकाला तिघांकडून बेदम मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सहा ते शनिवारी सकाळी सव्वाअकरा वाजताच्या कालावधीत कुलकर्णी यांचे घर कुलूप लावून बंद होते. दरम्यान (Nigdi) अज्ञात चोरट्यांनी हॉलच्या खिडकीचे ग्रील उचकटून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन असा एकूण 72 हजारांचा ऐवज चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.