BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : आकुर्डी गावात मेडिकल दुकान फोडले

446
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – आकुर्डी गावातील मेडिकल दुकान फोडून दुकानातून रोख रक्कम आणि मोबाईल फोन चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 19) पहाटे उघडकीस आला.

मोहम्मद मोईनुद्दीन इमाम बक्ष शेख (वय 25, रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी गावातील शेख यांच्या मेडिकल दुकानाचे शटर लॉक उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातून 22 हजार रुपयांची रोख रक्कमम आणि एक मोबाईल फोन चोरून नेला. ही घटना मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास उघडकीस आली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.