Nigdi : बंद घराचे कुलूप तोडून साडेतीन लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज- बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने कपाटातील साडेतीन लाखांची रोकड चोरून नेली. आकुर्डीतील गणेशनगर परिसरात सोमवारी (दि.22) दुपारी ही घटना घडली.

या प्रकरणी सुबोध दिनकर अभ्यंकर (वय 34, रा.गणेशनगर, आकुर्डी) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अभ्यंकर यांचा फ्लॅट सोमवारी दुपारी पावणेतीन ते पावणे चारच्या दरम्यान बंद होता. त्यावेळी चोरटयांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातली 3 लाख 48 हजार 600 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. अभ्यंकर घरी आले असता हा प्रकार उघडलीस आला. सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनावणे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.