Nigdi : घरफोडी करून साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – घरातील लोखंडी कपाटात ठेवेलेले सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण 5 लाख 68 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी निगडी प्राधिकरण येथे उघडकीस आली.

राहूल बबन महांगरे (वय 43, रा. रामेश्वर प्लॉट, प्राधिकरण निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. दरम्यान त्यांचे घर 13 ते 25 आॅगस्ट या कालावधीमध्ये कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरातील पहिल्या मजल्यावरील खोलीतील लोखंडी कपाटात ठेवलेले 185 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख 9 हजार रुपये असा एकूण 5 लाख 68 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.