BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : दुकानाचे शटर उचकटून 60 हजारांचा ऐवज लंपास

0 110
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- दुकानाचे शटर उचकटून चोरटयांनी 60 हजारांचा ऐवज चोरून नेला. रविवारी (दि. 14) पहाटे पाचच्या सुमारास निगडीतील डिलक्स फॅशन दुकानात हा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी जोगराज लिखमसिंग राजपुरोहित (वय 22, रा.आकुर्डी) यांनी फिर्यादी दिली आहे. त्यानुसार, दोन अज्ञात चोरट्यांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजपुरोहित यांनी शनिवारी रात्री त्यांचे दुकान नेहमीप्रमाणे बंद केले. दरम्यान अज्ञात चोरटयांनी शटर हाताने उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील 50 हजार रोख आणि 10 हजार रुपयांची सोन्याची अंगठी असा 60 हजारांचा ऐवज चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक संतोष घाडगे अधिक तपास करीत आहेत.

 

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.