Nigdi : आकुर्डीमध्ये एकाच रात्री तीन दुकानात चोरी करून 70 हजारांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज – आकुर्डी परिसरातील तीन दुकानांचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी 70 हजार 700 रुपयांची रोकड चोरून नेली आहे. ही घटना रविवारी (दि. 29) पहाटे घडली आहे.

हसमुख हिराचंद मुथा (वय 30, रा. मार्केट यार्ड, पुणे) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हसमुख यांचे आकुर्डी येथे लुईस फिलिप्स हे दुकान आहे. त्यांच्या दुकानाचे रविवारी रात्री शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी 56 हजार 200 रुपयांची रोकड चोरून नेली. तसेच त्यांच्या शेजारी विश्वास श्रीराम इंगोले यांचे बी हेल्दी डायग्नोस्टिक सेंटरमधून 15 हजार आणि संतोष वलयानी यांच्या टायटन दुकानातून 12 हजार रुपये असे एकूण 70 हजार 700 रुपये चोरून नेले. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार उघकीस आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.