Nigdi : डाएट विसरायला लावणारे कॅफे फूडस्टर्स

(अश्विनी जाधव )

एमपीसी न्यूज- #डाएट ! हो घेतलंय मी मनावर…म्हणजे माझ्या मनाने मला अजून तेवढं सिरीयसली घेतलं नाहीये हा भाग निराळा😜😜 पण तरीही अगदी निग्रहाने डायट करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते मी. पण काय होतं ना बाजार डे च्या दिवशी मोबाईल हातात घेऊन बसण्याची फार वाईट सवय.. मग काय अशा पोस्ट बघितल्या जातात.. म्हणजे खादाडीच्या हां.. मग आपणच टेम्प्ट होतो.. घराच्या जवळच आहे जाऊन येऊ की.. तसंही cheat day असतोच की.. तर हे सगळं सांगण्याचा हेतू हाच की हिच्या पोस्ट बघितल्या की की मनावरचा संयम जाऊन मी लगेच तिथे खादाडी करायला जाते.  गेल्या काही दिवसांपासून मी भेळ चौकातल्या #cafe_Foodsters मध्ये केलेल्या खादाडीसाठी आजच्या review चा घाट घातला आहे.

#जांभुळ_पिकल्या_झाडाखाली…🎶🎶🤩🤩 सुरुवात अशी केली का कारण आजचा पहिला review आहे #जामून_शॉट्सचा..

बऱ्याच जणांकडून कौतुक ऐकलं होतं म्हणून ठरवलं एकदा स्वतः जाऊन यायचं. कालच तिला फोन करून सांगितलं आणि संध्याकाळी दिली धडक…

#जामुन_शॉट्स… स्पेशली फक्त याच शॉट्स साठी मी गेले होते…आहाहा खरोखर जांभूळ खाल्ल्याचा फील आला.. इतका #Pure, #अप्रतिम आणि #येकदम_वरिजनल चवीचा! 😋😋😋 अजून पण चव रेंगाळतेय जिभेवर 😋😋😋
#जामुन_शॉर्ट घेतल्या नंतर मी एकदा तिथले #पान_शॉट्स try केले. पानाचे शौकीन असाल तर नक्कीच आवडेल. पानाचा खरोखर अर्क होता त्यात. किंमत फक्त 60/- (यात 2 शॉट्स येतात)

स्ट्रार्टर्स मध्ये #Mozorella_Cheese_Sticks चीझ लव्हर्ससाठी स्पेशल ! मस्त कुरकुरीत cheese sticks होत्या फक्त 100/-.

#Chicken_Poppers पण तसेच मस्त crunchy होते. लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असे होते(किंमत 120/-)

#Tandoori_Paneer_Roll तिने सांगितलं म्हणून मी घेतला खरं तर कारण मैदा म्हणून मी avoid करत होते. पण खाल्ल्यावर समजलं… भारी होता…ठीके ना.. उद्या डबल कार्डिओ करूया 😜 किंमत 80/-

_MPC_DIR_MPU_II

#Tandoori_Paneer_Pizza हां हा मी ऑर्डर केला होता तेही शेजारचे टेबलवरचा बघून😂😂 विचार केला तसही उद्या डबल कार्डिओ करणारच आहे ना.. मग आत्ता हाणुयात 😜😜 आणि खरं सांगू या डाएटमुळे पिझ्झाला ना कायम कमी लेखण्यात येतं आणि खातानाही मनावर कित्येक मणांचं ओझं असतं 🤭🤭😜
असू दे.. पिझ्झा worth होता खुप 😋😋 मला आवडला. किंमत 160/-

#Peri_Peri_Fries_With_Cheese आता याचा फोटो आधी बघा म्हणजे कळेल की मी इतक्या कॅलरीज का घेतल्या🤪 येक नंबर 😋😋😋😋(70/-)

#BBQ_Paneer_Cheese_Sandwich – कॅफेमध्ये गेलोय आणि सँडविच खाल्ले नाही असं करून कसं चालेल? #नक्कीच_खा या कॅटेगरी मधले आहे. थोडं वेगळं काहीतरी😋 (120/-)

#Watermelon_Mojito #Green_Apple_Mojito मस्त होतेच पण #Virgin_Mojito माझं ऑल टाइम फेव्हरेट 🤩😋 कॅफे बऱ्यापैकी मोठे आहे आणि कपल्ससाठी मस्त privacy पण आहे🤫🤪 त्यामुळे कोणाला काय प्लॅन करायचं असेल तर लगेच करून टाका 😅😅

टिप – #ही_सर्व_खादाडी_मी_एका_दमात_आणि_एकटीने_केलेली_नाही_कृपया_याची_नोंद_घ्यावी 😊

पत्ता –  #कॅफे फूडस्टर्स, शॉप 6, सेक्टर 25, भेळ चौक, प्राधिकरण, निगडी – 411044

074981 33103

https://maps.app.goo.gl/FS1PVrSx4XU2qDYG6

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.