Nigdi : पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पती व सासरच्यांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – शारीरिक व मानसीक छळ करत महिलेचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पती व त्याच्या कुटुंबावर निगडी (Nigdi) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 9 डिसेंबर 2012 ते आज अखेरपर्यंत पालघर येथे घडला.

याप्रकरणी महिलेने निगडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून निलेश बिप्पीनचंद्र चौधरी (वय 39), दोन महिला आरोपी सर्व राहणार पालघर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maval : उद्योजक रामदास काकडे यांच्याकडून वाघजाई देवी मंदिरास लोखंडी बेंच प्रदान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीने लग्न झाल्यापासून त्यांना शारीरिक व मानसीक त्रास देऊन छळ केला.तसेच घरगुती भांडणात 9 सप्टेंबर 2022 रोजी गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. याच्यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल (Nigdi) करण्यात आला आहे. पोलीस याचा पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.