Nigdi : व्यावसायिकाला मारहाणप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दुकान बंद करून मित्रांसोबत बोलत थांबलेल्या एका दुकानदाराला दोघांनी मिळून बेदम मारहाण केली. तसेच सिमेंटच्या गट्टूने मारून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 3) रात्री नऊ वाजता दत्तवाडी आकुर्डी येथे घडली. याप्रकरणी सोमवारी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साकीत निसार शेख, सोहेल निसार शेख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अतुल मारुती घाडगे (वय 36, रा. आलोरकर चाळ, आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घाडगे यांचे साईदर्शन नगर दत्तवाडी येथे गोर्जीअस डीस्पोजल हे दुकान आहे. सोमवारी रात्री नऊ वाजता घाडगे यांनी दुकान बंद करून दुकानासमोर त्यांच्या मित्रांसोबत बोलत थांबले. त्यावेळी दोघे आरोपी तिथे आले. त्यांनी ‘तू आमच्याकडे का बघतोस’ असे म्हणत शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.

आरोपी साकीत याने रोडवर पडलेला सिमेंटचा गट्टू घाडगे यांच्या डोळ्याखाली मारला. यात घाडगे जखमी झाले. घाडगे यांचे मित्र भांडण सोडविण्यासाठी आले असता आरोपींनी मित्रांना देखील शिवीगाळ करत मारहाण केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.