BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : कोट्यवधींचा विक्रीकर बुडणाऱ्या व्यापार्‍यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – विक्रीकराची एक कोटींची रक्कम न भरता व्यापाऱ्याने शासनाची फसवणूक केली. तसेच शासनाकडून वाढीव मुदत मिळूनही रक्कम भरण्यास टाळाटाळ केली. याप्रकरणी व्यापाऱ्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जितेंद्र जनार्दन दळवी (रा. प्राधिकरण निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी राज्य अधिकारी मनीषा दत्ताजी पाडळकर यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2012 ते मार्च 2018 या कालावधीत व्यापारी जितेंद्र यांच्यावर 98 लाख 56 हजार 999 रुपये विक्रीकराची थकबाकी होती. ती त्यांनी मुदतीत भरली नाही. त्यानंतर शासनाकडून विक्रीकराची रक्कम भरण्यासाठी मुदत वाढवून घेतली. शासनाकडून मुदत वाढ मिळाल्यानंतर देखील त्यांनी रक्कम न भरता शासनाची फसवणूक केली. याबाबत राज्य अधिकारी पाडळकर यांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.