Nigdi: विधानसभेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 50 च्यापुढे जागा येणार नाहीत – रामदास आठवले

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना-आरपीआयसह मित्र पक्ष एकत्र आलो आहेत. आमचा 225 च्यावर जागा मिळविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र आले. तरी, त्यांना फारशा जागा मिळणार नाहीत. 50 च्यावर दोन्ही काँग्रेसला जागा मिळणार नाहीत, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (शनिवारी) निगडीत केला. तसेच विधानसभा निवडणुकीदरम्यान राजकीय पक्षांनी प्रचाराची पातळी खालावू नये, असे आवाहन त्यांनी केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेची राज्यात यात्रा सुरु आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस देखील यात्रा काढणार आहे. याबाबत पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले, प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. निवडणुकीच्या दृष्टीने मते मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

  • लोकशाहीमध्ये सर्वांना तो अधिकार आहे. यापूर्वी देखील यात्रा निघाल्या आहेत.आत्ताही यात्रा निघत असून यावेळी यात्रांचे प्रमाण जास्त आहे. बाकीच्यांनी कितीही यात्रा काढली. तरी, आमच्या यात्रांनाच जनाधार आहे.

सगळ्यांनी आप-आपला प्रचार करावा. परंतु, प्रचाराचा तोल जावू देऊ नये. महाराष्ट्राची पंरपरा चांगली आहे. त्यामुळे एकमेकांवर खोटे नाटे आरोप कोणीही करु नयेत. प्रचार चांगल्या पद्धतीने करावा. पक्षाला मते मागावीत. भाजप-शिवसेना-आरपीआय एकत्र आलो आहेत. 225 च्यावर जागा मिळविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले. तरी, त्यांना फारशा जागा मिळणार नाहीत. 50 च्यावर जागा दोन्ही काँग्रेसला मिळणार नाहीत, असेही आठवले म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.