Nigdi: लायन्स क्लब ऑफ पुणे निगडीच्या वतीने कोरोना योद्धयांचा सन्मान

Corona Warriors honored on behalf of Lions Club of Pune Nigadi

एमपीसी न्यूज – लायन्स क्लब ऑफ पुना निगडीच्या वतीने भारतरत्न डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर दिनानिमित्त कोरोना योध्दा डॉक्टर, परिचारिका, वाहतूक पोलिस, सफाई कर्मचारी, मेडिकल चालक आणि समाजसेवकांचा ‘फ्रंटलाईन कोरोना वॉरीयर’ म्हणून सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी महापालिकेच्या यमुनानगर रूग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताडे आणि त्यांचे सहकारी डॉक्टर, सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्किमचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र मोरे, महापालिका रूग्णालयामधील परिचारिका, ससून हॉस्पिटलमधील कोवीड पॉझिटिव्ह वॉर्डात काम करणार्‍या परिचारिका, निगडी वाहतूक शाखेच्या महिला पोलिस कर्मचारी, सफाई कर्मचारी, मेडिकल चालक, कोवीड-19 या महामारीच्या साथीत गोर-गरिबांना भोजन, अन्नधान्य पुरवठा करणार्‍या संस्थांना गौरविण्यात आले.

प्रांतपाल लायन अभय शास्त्री यांच्या कल्पनेनुसार हा कार्यक्रम घेण्यात आला.

लायन्स क्लब निगडीचे अध्यक्ष लायन मारुती मुसमाडे यांनी सूत्रसंचालन केले. रिजन चेअरपर्सन लायन सुदाम मोरे आणि झोन चेअरपर्सन लायन दिलीपसिंह मोहिते यांनी मार्गदर्शन केले.

लायन मिनांजली मोहिते यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.