Nigdi Crime : पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगाराला खंडणी दरोडा विरोधी पथकाकडून अटक; सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून सव्वा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

अभिजीत उर्फ बंगाली सुभाष रॉय (वय 22, रा. देहूरस्ता, संभाजीनगर, मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक किरण काटकर यांना माहिती मिळाली की, एका काळया रंगाच्या होंडा कंपनीच्या दुचाकीवर (एम एच 14 / एफ बी 7989) एक तरुण आला आहे. त्याच्या जवळ असलेली दुचाकी आणि मोबाईल फोन हे चोरीचे आहे. त्यानुसार परिसरात सापळा रचून पोलिसांनी अभिजित याला शनिवारी (दि. 17) रात्री सव्वानऊ वाजता ताब्यात घेतले.

_MPC_DIR_MPU_II

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन मोबाईल फोन, एक आयपॅड मिळाला. पोलिसांनी दुचाकीसह 1 लाख 28 हजारांचा ऐवज जप्त केला. अभिजित याने चार महिन्यांपूर्वी आकुर्डी परिसरातून ॲपल कंपनीचा आयपॅड आणि दुचाकी चोरली आहे. याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

अभिजित याच्यावर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात नऊ, पिंपरी आणि भोसरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे 11 गुन्हे दाखल आहेत. त्याला पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार देखील करण्यात आले होते.

आरोपी अभिजीत हा दाखल गुन्ह्या व्यतिरिक्त चिखली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्यात फरार आरोपी होता. आरोपी अभिजीत याला पुढील कारवाईसाठी निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.