Nigdi Crime : भांडण सोडविणा-या महिलेला दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज – मुलीला मारहाण करत असलेल्या एकाला अडवून भांडण सोडवत असलेल्या महिलेला दगडाने मारून जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 7) सकाळी साडेआठ वाजता दळवीनगर झोपडपट्टी, ओटास्कीम, निगडी येथे घडली.

गीता अनिल मधुरे (वय 46, रा. दळवीनगर, झोपडपट्टी, ओटास्कीम, निगडी) यांनी याबाबत शनिवारी (दि. 7) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राकेश शिंदे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राकेश शिंदे हा फिर्यादी यांच्या मुलीसोबत शनिवारी सकाळी भांडण करत होता. फिर्यादी यांच्या मुलीला शिवीगाळ करून त्याने हाताने मारहाण केली. त्यामुळे फिर्यादी त्यांची भांडणे सोडविण्यासाठी गेल्या. त्यावेळी राकेश याने फिर्यादी यांना शिवीगाळ करून रस्त्यावर पडलेला दगड मारून जखमी केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.