_MPC_DIR_MPU_III

Nigdi : अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध, जबरदस्तीने लग्न आणि गर्भपात केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही लॉजवर बोलावून तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर आळंदी येथे बोलावून लग्न केले. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर मारहाण करून गर्भपात केला. याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_IV

हा प्रकार 2017 पासून मार्च 2020 या कालावधीत भक्ती शक्ती चौक- निगडी, डांगे चौक -वाकड, आळंदी, जेजुरी, हिंजवडी, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथे घडला आहे.

सोमनाथ तुकाराम हतारगे (वय 27, रा. हंडराळ गाव, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 18 वर्षीय पीडितेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेची आणि आरोपीची 2017 मध्ये ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. एके दिवशी आरोपीने खूप महत्वाचे काम असल्याचे सांगून पीडितेला निगडी येथील भक्ती शक्ती चौकात बोलावले.

_MPC_DIR_MPU_II

तिथे एका लॉजवर नेऊन ‘तू मला आवडतेस’ असे म्हणत पीडितेचा नकार असतानाही जबरदस्तीने तिच्याशी शरीरसंबंध केला.

त्यानंतर आळंदी येथे बोलावून कोणीही नातेवाईक नसताना आरोपीने पीडितेशी मंदिरात लग्न केले. त्यानंतर आरोपीने पीडितेला काही दिवस जेजुरी येथे ठेवले. तिथे दोघांचे वाद होऊ लागल्याने दोघे हिंजवडी येथे राहण्यास आले. दरम्यान, पीडिता गरोदर राहिली.

हिंजवडी येथे आल्यानंतर आरोपीने पीडितेकडे गर्भपात करण्याची मागणी केली. त्यावरून दोघांची भांडणे होऊ लागली. एक दिवस आरोपी पीडितेला शिवीगाळ, मारहाण करून शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथे गेला. पीडिता देखील आरोपीच्या मागे गेली आणि त्यात तिचा गर्भपात झाला.

पीडिता अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही आरोपीने तिच्याशी वारंवार शरीरसंबंध ठेऊन गर्भपात घडवून आणल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.