Nigdi : तरुणीच्या विनयभंग प्रकरणी तरुणावर गुन्हा

Crime against a youth in a case of molestation of a young woman

एमपीसी न्यूज – तरुणीचा वारंवार पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना प्राधिकरण, निगडी येथे घडली आहे.

अनुराग आनंद देशमुख (वय 28, रा. तुकाराम गार्डन जवळ, संभाजी चौक, निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 29 वर्षीय तरुणीने मंगळवारी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2019 ते 8 जून 2020 या कालावधीत ही घटना घडली. आरोपी आणि फिर्यादी तरुणी एकाच कंपनीत कामाला असल्याने ते एकाच कारमधून जात होते. त्यावेळी आरोपीने त्या तरुणीचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर त्या मोबाईलवरून चॅटिंग करण्यास सुरवात केली.

तरुणीला लग्नाची मागणीही घातली. यामुळे घाबरलेल्या तरुणीने त्याचा मोबाइल क्रमांक ब्लॉक केला. मात्र, त्यानंतरही आरोपीने तरुणीला त्रास देणे थांबविले नाही. ‘तू माझ्याशी का बोलत नाहीस’, असे म्हणत फिर्यादी तरुणी कोणाकोणाशी बोलतात यावर आरोपी लक्ष ठेवू लागला.

घरून कामापर्यंत आणि कामावरून घरी येताना तरुणीचा आरोपी पाठलाग करू लागला. ‘तुझ्या घराबाहेर येऊन आत्महत्या करेल’, अशी धमकी आरोपीने तरुणीला दिली. याबाबत तरुणीने अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर एकेदिवशी कामावरून घरी जात असताना फिर्यादी या आईसोबत असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपीने फिर्यादी तरुणीशी गैरवर्तन करत विनयभंग केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास आरोपी देशमुख याने आपल्याला फिर्यादी तरुणीच्या वडिलांनी मारहाण केल्याची परस्पर विरोधी फिर्याद दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास निगडी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.