Nigdi : मेडिकल दुकान उचकटल्याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – आकुर्डी येथे मेडिकल दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी सुमारे 38 हजारांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 10) सकाळी आकुर्डी येथे उघडकीस आला.

महेश दिनकर जानुगडे (वय 33, रा. पंचतारानगर, आकुर्डी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश यांचे पंचतारानगर आकुर्डी येथील महाराष्ट्र चौकात मंगलमूर्ती मेडिकल दुकान आहे. त्यांनी मेडिकल दुकान 9 डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजता कुलूप लावून बंद करुन गेले.

अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे लोखंडी शटर उचकटले. दुकानातील काऊंटरमधून 38 हजार रुपयांची रोकड व इतर साहित्य चोरून नेले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.