Nigdi Crime : सहकारी पतसंस्थेच्या जनरेटरमधील बॅटरी चोरीला

एमपीसी न्यूज – सहकारी पतसंस्थेच्या जनरेटरमधून अज्ञात चोरट्यांनी सात हजारांची बॅटरी चोरून नेली. ही घटना 13 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता उघडकीस आली असून याबाबत 19 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शशिकांत शंभू चौबे (वय 43, रा. विकासनगर, किवळे, देहूरोड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौबे चिंचवड स्टेशन चौकात असलेल्या मयूर ट्रेड सेंटर येथील श्री नागरी सहकारी पतसंस्थेत नोकरी करतात. 13 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ते नोकरीवर आले असता इमारतीच्या पार्किंगमध्ये असलेल्या जनरेटरचा दरवाजा उघडा होता. जनरेटरचे कुलूप तुटलेले होते. अज्ञात चोरट्यांनी जनरेटरमधून सात हजारांची बॅटरी चोरून नेली होती. याबाबत एक महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.