Nigdi Crime : आकुर्डीतील एका नामांकित रुग्णालयात चढ्या दराने कोरोना औषधांची विक्री; नातेवाईकांची तक्रार

औषध प्रशासन विभागाकडून चौकशी सुरु

एमपीसी न्यूज – निगडी येथील एका नामांकित रुग्णालयात कोरोनावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणा-या औषधांची चढ्या दराने विक्री केली जात असल्याची तक्रार एका रुग्णाच्या नातेवाईकांनी केली. त्यावर औषध प्रशासन विभागाकडून चौकशी केली जात आहे.

आकुर्डी येथे असलेल्या एका नामांकित रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाला चढ्या दराने औषधांची विक्री केली. याबाबत रुग्णाच्या नातेवाईकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. नातेवाईकांनी मंगळवारी (दि. 22) रात्री पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे. त्यानंतर औषध प्रशासन विभागाने तत्काळ धाव घेत या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.

‘कोणत्या औषधांची किती किंमत आहे. त्याची विक्री कोणत्या किमतीला करावी. तसेच रुग्णालयात वापरण्यात येणारी औषधे कुठून खरेदी झाली. याबाबत सर्व चौकशी औषध प्रशासन विभाग करणार असल्याचे निगडी पोलिसांनी सांगितले.

औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त सुरेश पाटील यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कार्यालयातून या प्रकरणाबाबत फोन आला असल्याचे म्हटले जात आहे. आरोग्य मंत्र्यांच्या कार्यालयातून फोन आल्यानंतर प्रशासनाने धावपळ सुरु केल्याचीही चर्चा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.